Tiranga Times Maharastra
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी ठरल्याची माहिती पुढे आली असून, यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी उमेदवारीवरून नाराजी, बंडखोरी आणि पक्षांतराचं चित्र दिसून आलं. काही इच्छुकांनी थेट अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले, तर काहींनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत रिंगणात उडी घेतली. या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच भाजपने पहिला विजय नोंदवत आघाडी घेतल्याचं चित्र आहे.
महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच मिळालेल्या या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, आगामी निकालांसाठी पक्षाचा आत्मविश्वास वाढल्याचं बोललं जात आहे.
bjp-first-corporator-win-maharashtra-mahanagarpalika-election
